Prajakta Mali News : अभिनेत्री प्राजक्ता माळीने बदललं तिचं नाव; इंस्टाग्रामवर पोस्ट करत केली घोषणा

Prajakta Mali Name Change : सोशल मीडियावर काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असलेली महाराष्ट्राची क्रश प्राजक्ता माळीच्या लेटेस्ट पोस्टची चर्चा सध्या सगळीकडे होतेय.
Prajakta Mali Name Change
Prajakta Mali Name Change

Prajakta Mali Latest News : सोशल मीडियावर काही ना काही कारणांमुळे सतत चर्चेत असलेली महाराष्ट्राची क्रश प्राजक्ता माळीच्या लेटेस्ट पोस्टची चर्चा सध्या सगळीकडे होतेय. प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या नावात तिने बदल केल्याचं जाहीर केलं आणि तिच्या या पोस्टमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

काय घडलं नेमकं?

प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. त्यात तिने तिचं संपूर्ण नाव 'प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी' असं जाहीर केलं आणि सोबत एक पोस्ट शेअर केली. त्यात ती म्हणते,"#letepost

नमस्कार मी प्राजक्ता श्वेता माळी, काय झालं, अहो हो हो बरोबर नांव ऐकलं तुम्ही, आता आपल्या नावा नंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे, अहो हे मी नाही आपलं सरकार बोलत आहे. “आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्वाचं आहे तितकंच आईचं नाव देखील महत्वाचं आहे, आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास मंत्री “अदिती वरदा सुनील तटकरे “ ताई यांनी. आता यापुढे सर्व शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावा आधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे. तर आहे ना अभिमानाची गोष्ट......

धन्यवाद @aditisuniltatkare @🙏🙌🏻😇

#finally"

Prajakta Mali Name Change
Govinda: गोविंदाची भाची 'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात; मुंबईतील व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ

प्राजक्ताने ही पोस्ट शेअर केल्यावर अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काहींनी त्यांना निर्णय पसंत पडला नाही असं म्हंटल. तर काहींनी "मुलीच्या लग्नानंतर तिने कसं नाव लावायचं?" असा प्रश्न प्राजक्ताच्या पोस्टवर विचारला. तर काहींनी यापेक्षा महत्त्वाचे मुद्दे आपण सोडवायला हवेत अशी प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी प्राजक्ताचं अनुकरण करत स्वतःच्या आईचं नावसुद्धा संपूर्ण नावात जोडलं.दरम्यान प्राजक्ता लवकरच 'भिशी मित्रमंडळ' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिनेमाचा मुहूर्त नुकताच पार पडला.

Prajakta Mali Name Change
Kareena Kapor Khan: 'टॉम अँड जेरी, बिर्याणी आणि बरंच काही', बेबोने चाहत्यांसोबत शेअर केल्या तिच्या आवडत्या गोष्टी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com