JARAN MOVIE : भय, भावनिक तडका आणि थ्रिलर! ‘जारण’चा नवा विक्रम, 12 दिवसांत कमावला 3.5 कोटींचा गल्ला

JARAN MOVIE BOX OFFICE COLLECTION:अभिनेत्री अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या मुख्य भूमिकेत असलेला हॉरर चित्रपट जारणने 12 दिवसात तब्बल 3.5 कोटींचा गल्ला कमावला आहे. मराठी चित्रपटातील हा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरलाय.
JARAN MOVIE BOX OFFICE COLLECTION
JARAN MOVIE BOX OFFICE COLLECTIONesakal
Updated on: 

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत 'जारण' चित्रपट प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवतय. दमदार अभिनय, हृदयाला भिडणारी कथा आणि उत्तम दिग्दर्शन यामुळे चित्रपटाने केवळ 12 दिवसांत तब्बल 3.5 कोटी रुपयांची कमाई केलीय. बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. विशेष म्हणजे, दुसऱ्या आठवड्यात केवळ विकेण्डला या चित्रपटाने तब्बल 1.65 कोटींचा गल्ला जमवला आहे, जो अलीकडच्या काळातील सर्वाधिक असल्याचे मानले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com