
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन वेगवेगळ्या कारणांमुळे कायमच चर्चेत असतात. मात्र आता पुन्हा एकदा त्यांच्या रागीट स्वभावामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये एका व्यक्तीने त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्याला जोरात धक्का दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून नेटकरीही आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसतायत.