
Latest News : अभिनेत्री आणि राज्यसभेच्या खासदार असलेल्या जया बच्चन त्यांच्या सडेतोड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. राज्यसभेतील त्यांची भाषण खूप गाजतात. काल संसदेतील आंदोलनात झालेल्या धक्काबुक्की दरम्यान भाजपचे खासदार प्रताप सारंगी जखमी झाले होते. यावरून जया बच्चन यांनी सारंगी यांच्यावर निशाणा साधला.