Jeev Movie Review: 'जीव' लोकसंस्कृतीचा अन् संघर्षाचा

Jeev Marathi Movie : 'जीव' हा सिनेमा आदिवासी कोकणी लोकांचं जगणं त्यांच्या प्रथा-परंपरा, त्यांचं लोकसंगीत यामध्ये तिथली पारंपारिक गाणी, वाद्ये, भाषा, पेहराव, खाद्य, परंपरा या सर्व गोष्टींवर भाष्य करतो.
Jeev Marathi Movie

Jeev Marathi Movie

esakal

Updated on

Jeev Movie Review : महाराष्ट्राची अस्मिता मराठी भाषा आणि मराठी संस्कृती अशी असली तरी ही मराठी भाषा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील स्थानिक लोकभाषा आणि लोकसंस्कृतीतून विकसित झालेली आहे. त्यामुळं मराठी इतकंच त्या भाषा-संस्कृतींना देखील महत्व आहे. आज मराठीवरच अनेक प्रकारचे घाव होत असताना दुर्लक्षित राहिलेल्या या स्थानिक भाषांचं काय घेऊन बसलात! एखाद्या अतिदुर्गम भागातील छोट्या लोकसमुहाची भाषा आपल्याला सहज माहिती असणं कठीणचं! पण काही पुस्तक चाळल्यानंतरच तिची ओळख होऊ शकते. पण अशीच एक लोकभाषा, तिथली संस्कृती, चालीरितींची ओळख करुन देणारा चित्रपट आपल्या भेटीसाठी आला आहे. खान्देशातल्या अत्यंत दुर्गम अशा आदिवासी कोकणी भाषा आणि संस्कृतीवर हा चित्रपट भाष्य करतो. लोकांना भाषा टिकावी यासाठी कितीही आवाहन केलं तरी त्याचा किती फायदा होतो किंवा नाही हे आपल्याला माहितीच आहे. पण किमान त्या भाषेची एक परिणामकारक ओळख करुन देणं ही संस्कृती टिकवण्याचा कार्याचा एक भाग बनू शकतं. या अनुषंगानं 'जीव' हा सिनेमा आदिवासी कोकणी लोकांचं जगणं त्यांच्या प्रथा-परंपरा, त्यांचं लोकसंगीत यामध्ये तिथली पारंपारिक गाणी, वाद्ये, भाषा, पेहराव, खाद्य, परंपरा या सर्व गोष्टींवर भाष्य करतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com