

Jennifer Barreto
Esakal
मिस युनिव्हर्स २०२६ चा मुकुट प्वेर्तो रिकोच्या जेनिफर बॅरेटोने जिंकला आहे. यंदाची स्पर्धा अनेक कारणांनी खास ठरली. जेनिफरने विजेतेपद मिळवत इतिहास रचला आहे. कारण मिस युनिव्हर्सचा मुकुट जिंकणारी ती पहिली आई ठरली आहे. तिच्या विजयामुळे प्वेर्तो रिकोला सहाव्यांदा हा किताब मिळाला आहे. २४ नोव्हेंबर रोजी प्वेर्तो रिकोची राजधानी सॅन हुआन येथे स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. ही स्पर्धेची ७५ वी आवृत्ती होती. जगभरातील ११६ स्पर्धकांनी यात भाग घेतला होता. मेक्सिकोची फातिमा बॉश हिच्याकडून जेनिफरने विजेतेपदाचा मुकुट स्वीकारला.