
उत्तम आशय-विषयासाठी मराठी सिनेमा ओळखला जातो. मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण व चांगल्या विषयाची निवड निर्माते व दिग्दर्शक जाणीवपूर्वक करू लागले आहेत. ही बाब लक्षात घेऊन आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी हटके धाटणीचा ‘जिलबी’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. नितीन कांबळे दिग्दर्शित ‘गोड आणि गूढ’ अशा दोन्ही फ्लेवर्सच्या ‘जिलबी’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय.