

Marathi Entertainment News : आजची मराठी रंगभूमी नव्या विचारांनी, तरुण ऊर्जेने आणि समकालीन विषयांनी समृद्ध होताना दिसत आहे. पारंपरिक चौकटींपलीकडे जात तरुण लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार मानवी नातेसंबंध, सामाजिक वास्तव आणि आजच्या पिढीच्या भावविश्वावर आधारित नवे प्रयोग रंगभूमीवर साकारत आहेत. जुन्या-जाणत्या कलाकारांच्या बरोबरीने ताज्या दमाच्या कलाकारांना संधी द्यावी, असा विचार निर्माते-दिग्दर्शकही करू लागलेत. व्यावसायिक नाटकांमधून हे नवं टॅलेंट पाहायला मिळतंय. ‘जोडीचा मामला’ हे असंच एक नवंकोरं नाटक नव्या दमाच्या कलाकारांना घेऊन निर्माते राहुल भंडारे आणि श्रेयस इंदापूरकर एकत्र आले आहेत.