

jui gadkari
ESAKAL
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री जुई गडकरी कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी मालिकेमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे ती चाहत्यांच्या चर्चेचा भाग असते. तीदेखील सोशल मीडियावर सक्रीय असते. इंस्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करताना दिसते. मात्र आता तिने शेअर केलेल्या एका पोस्टने चाहत्यांची चिंता वाढवलीये. तिने एक स्टोरी पोस्ट करत तिचा विमान अपघात होता होता बचावला असं लिहिलंय.