
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडतायत. या मालिकेची कथा आणि कलाकार दोन्ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने ही मालिका प्रेक्षकांची अत्यंत आवडती ठरतेय. गेले २ वर्ष ही मालिका टीआरपी यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. गेले दोन वर्ष मालिकेत वात्सल्य आश्रम केस सुरू होती. ही केस हरल्यानंतर साक्षी आणि प्रिया दोघांनाही पोलिसांनी अटक केलीये. प्रियाला सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आलीये. हा निकाल लावण्यासाठी ३० दिवसांचा काऊंटडाऊन देण्यात आला होता. त्यानंतर निकाल लागल्यावर मालिकेत ७ वर्षाची लीप येणार असल्याचं बोललं गेलं. मात्र आता जुईने तसं काहीही होणार नसल्याचं सांगितलं आहे.