मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेत असलेली अभिनेत्री जुई गडकरी हिचा आज वाढदिवस आहे. आज जुई 37 वर्षाची झाली. सध्या ती 'ठरलं तर मग' मालिकेवर मुख्य नायिकेची भूमिका म्हणजेच सायलीची भूमिका साकारत आहे. गेली तीन वर्ष ही मालिका टीआरपीमध्ये एक नंबर आहे. त्यामुळे सईची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढत जाताना पहायला मिळतेय.