रील आणि रिअल! वाढदिवसाला जुई गडकरी चाहत्यांना देणार खास सरप्राइज; एका नव्या गोष्टीची करणार सुरुवात

JUI GADKARI BIRTHDAY SPECIAL SURPRISE: छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिने नुकतीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीये.
JUI GADKARI

JUI GADKARI

ESAKAL

Updated on

'स्टार प्रवाहची स्टार नायिका असलेली लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. तिने 'पुढचं पाऊल' मालिकेतून स्वतःची ओळख निर्माण केली होती. आता ती सायली बनून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आता सायलीची खरी ओळख सगळ्यांसमोर आलीये. तीच खरी तन्वी असल्याचं सगळ्यांना समजलंय. मात्र आता मालिकेत हीच ओळख तिला कायमस्वरूपी मिळणार आहे. सोबतच तिच्या खऱ्या खऱ्या आयुष्यातदेखील अशीच एक खास गोष्ट होणार आहे. महत्वाचं म्हणजे या दोन्ही गोष्टी जुईच्या वाढदिवशी घडणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com