

JUI GADKARI DEEP FAKE VIDE
ESAKAL
सध्या सगळीकडे एआयचा बोलबाला दिसतोय. एआय सगळ्यांच्या नोकऱ्या खाणार, तो काहीही करू शकतो असं म्हणताना एआयचा वापर कमी आणि गैरवापर जास्त होताना दिसतो. एआयचा वापर करून अनेक कलाकारांचे चुकीचे आणि आक्षेपार्ह व्हिडिओ बनवण्यात येतात. असाच व्हिडिओ छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिचा बनवण्यात आलाय. महत्वाचं म्हणजे जुईने स्वतः तो व्हिडिओ पाहून तो बनवणाऱ्याला शेलक्या शब्दात सुनावलं आहे. आजच्या आज हा व्हिडिओ डिलीट करायला सांगून तिने तिने कायदेशीर कारवाई करण्याची सूचना दिलीये. असं काय आहे या व्हिडिओमध्ये?