JUI GADKARI

JUI GADKARI

esakal

'38 मध्ये नवऱ्याची भेट, 39 मध्ये लग्न आणि..' जुई गडकरीला कसं हवय वैवाहिक आयुष्य? पोस्ट शेअर करत म्हणाली...

JUI GADKARI TALKS ABOUT DREAM HUSBAND: ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी Jui Gadkari सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. जुईने एक पोस्ट रिशेअर करत त्यामध्ये ‘३७ मध्ये सिंगल, ३८ मध्ये नवऱ्याची भेट, ३९ मध्ये लग्न आणि ४० मध्ये प्रेग्नन्सी’ असा विचार मांडला आहे.
Published on

JUI GADKARI RESHARES EMOTIONAL POST ON MARRIAGE TIMELINE: मराठी टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरी 'ठरलं तर मग' मालिकेतून घराघरात पोहचली आहे. तिचं सायलीचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. महिलांमध्ये सायलीची क्रेझ सगळ्यात जास्त पहायला मिळते. सोशल मीडियावर सुद्धा जुईला अनेक जण फॉलो करताना पहायला मिळतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून जुई नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच आता जुईनं एक पोस्ट रिशेअर केलीय. त्या पोस्टमध्ये मुलगा कसा हवा, आयुष्य कसं हवं याबाबत तिने सांगितलंय. सध्या सोशल मीडियावर जुईच्या पोस्टची चर्चा रंगताना पहायला मिळतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com