JUI GADKARI SHARES KHATU SHYAM BABA DARSHAN EXPERIENCE
esakal
JUI GADKARI SHARES KHATU SHYAM BABA DARSHAN EXPERIENCE: 'ठरलं तर मग' मालिकेतील अभिनेत्री जुई गडकरी हिचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचं सायलीचं पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. जुईला अभिनयासोबत धार्मिक गोष्टींची सुद्धा आवड आहे. अध्यात्मिक श्रद्धेमुळे ती चर्चेत राहते. दरम्यान अशातच एका मुलाखतीत तिने खाटूश्यामबाबांच्या दर्शनाचा अनुभव सांगितला. तसंच यावेळी तिने तिच्या आयुष्यातील एक प्रसंग शेअर केला. खाटुश्यामबाबाचं बोलावणं आलं आणि कठीण काळातून मार्ग निघाला असं तिने सांगितलं. तिला त्यांचे काही संकेत सुद्धा दिसल्याचं ती म्हणाली.