

jui gadkari on ending tharla tar mag
esakal
'ठरलं तर मग' मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. गेले अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. मात्र गेले काही महिने या मालिकेचा ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत नाहीये. डिसेंबर २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ही मालिका वेगवेगळी वळणं घेत आलीये. आता शेवटी संपेल असं वाटत असतानाच मालिकेत नवीन ट्विस्ट आलाय. मालिकेत सायलीचे ओळख समजल्यानंतर आता तिला आणि प्रियाला बाळ झालं आहे. प्रिया त्यांच्या बाळाची अदलाबदली करते मात्र सायली दोन्ही बाळांना घेऊन घरी येते. मात्र हे कथानक पाहून आता प्रेक्षक कंटाळले आहेत. एका प्रेक्षकाने जुई गडकरीला ही मालिका बंद करण्याचा सल्ला दिला. त्यावर आता जुईनेच उत्तर दिलंय.