

JUI GADKARI
ESAKAL
मराठमोळी अभिनेत्री जी गडकरी हीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. मात्र तिचं वैयक्तिक आयुष्य प्रचंड चढउतारांनी भरलेलं होतं. जुईने अनेक कठीण प्रसंगांचा सामना केलाय. आज जुई 'ठरलं तर मग' मधून सायली बनून घराघरात पोहोचली असली तरी तिला काही वर्षांपूर्वी आरोग्याविषयी फार मोठी समस्या निर्माण झाली होती. आजारपणामुळे तिने मनोरंजनसृष्टीतून सुद्धा ब्रेक घेतला होता. एकेदिवशी जुई रात्री झोपली ती सकाळी उठलीच नाही. आता अभिजात मराठी ओटीटी' दिलेल्या मुलाखतीत जुईने त्या दिवशी काय घडलं याबद्दल सांगितलं आहे.