
jui gadkari
esakal
'ठरलं तर मग' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय मराठी अभिनेत्री जुई गडकरी प्रेक्षकांची आवडती आहे. तिने 'पुढचं पाऊल' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. तिच्या सध्या सालस चेहऱ्यावर आणि गोड हसण्यावर प्रेक्षक फिदा आहेत. आता ठरलं तर मग' मालिकेतून ती घराघरात लोकप्रिय झाली. ती सध्या मालिकेत सायलीच्या भूमिकेत दिसतेय. मात्र आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जुईने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. आज शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जुईने तिच्या आयुष्यातल्या नव्या कामाची सुरुवात केलीये.