
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या अभिनेत्री ज्योती चांदेकर म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या पुर्णा आजी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत. आजाराचं निमित्त झालं आणि ज्योती यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. त्यांच्या जाण्याने प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसलाय. त्या ६८ वर्षाच्या होत्या. गेल्या ३-४ दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यांनी अखेर या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यातही 'ठरलं तर मग' मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हिला त्यांच्या जाण्याचा मोठा धक्का बसलाय.