
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम कार्यक्रम 'ठरलं तर मग' च्या प्रेक्षकांना काल म्हणजेच १६ ऑगस्ट २०२५ रोजी मोठा धक्का बसला. या कार्यक्रमात पुर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं आजाराने निधन झालं. त्यांनी तब्येत बिघडल्याने मालिकेतून काही दिवस ब्रेक घेतला होता. मात्र त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना पुण्यातील इस्पितळात दाखल करण्यात आलं. अखेर ५ दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी पूर्णा आजी बनून प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. मात्र आता ज्योती यांच्या निधनानंतर पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय.