

k drama new series
esakal
ही कहाणी आहे एका टॉप एक्ट्रेसची, जिने आपल्या सौंदर्याला आपलं सर्वात मोठं हत्यार बनवलं आहे. ती प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. तिच्या आजूबाजूचे लोक तिच्या वागणुकीचे आणि चांगल्या स्वभावाचे चाहते आहेत. परंतु १२ भागांच्या या सीरिजमध्ये एक असा ट्विस्ट येतो, जिथे तुमच्या डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींवरूनही तुमचा विश्वास उडून जातो. तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही की कोणताही माणूस इतका वाईट असू शकतो. एक प्रेक्षक म्हणून तुम्ही स्वतःला प्रश्न विचारता की कोणी इतकं स्वार्थी (Narcissistic) कसं असू शकतं. कारण जगाला जी टॉप एक्ट्रेस आणि गोड बोलणारी व्यक्ती वाटते, तिच्यामागे एक भयानक चेहरा दडलेला आहे. जर तुम्ही कोरियन ड्रामा सिरीजचे शौकीन असाल, तर OTT वरची ही सायकॉलॉजिकल थ्रिलर वेब सिरीज तुम्हाला हादरवून सोडेल. या सिरीजला IMDb वर ८.५ इतकं जबरदस्त रेटिंग मिळालं आहे.