

Marathi Interview : ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटामुळे राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक पुरस्कार पटकाविणाऱ्या दिग्दर्शक शंतनू रोडे आता नव्या कथेसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘कैरी’ हा त्याचा नवा चित्रपट आता प्रदर्शित होत आहे. सुबोध भावे, सायली संजीव, सिद्धार्थ जाधव आणि शशांक केतकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटाचे कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात चित्रीकरण करण्यात आले आहे.