
kajol viral video
esakal
बॉलिवूड अभिनेत्री काजोल आजही आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. तिने ९०चं दशक गाजवलंय. 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'ट्रायल' पर्यंत ती आपल्या अभिनयाने आजही सगळ्यांना अचंबित करत आलीये. मात्र तिच्या चित्रपटांसोबत तिच्या वैयक्तिक आयुष्याची देखील नेहमीच चर्चा रंगते. काजोल दरवर्षी नवरात्रीत मोठ्या उत्साहात दुर्गा पूजा करते. या वर्षीही तिने मोठ्या उत्साहात दुर्गा पूजा केली. २ ऑक्टोबर रोजीही ती देवीच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी आली होती. तिच्यासोबत अभिनेत्री राणी मुखर्जी, जया बच्चनदेखील या पूजेसाठी हजर होत्या. मात्र काजोलचा मंडपातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय जो पाहून नेटकरी संतापले आहेत.