Kajol’s Onscreen Kiss with Jisshu Sengupta in The Trial 2 Goes Viral
esakal
अभिनेत्री काजोल ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिची 'द ट्रायल 2' ही वेबसीरिज प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. हॉटस्टारवर ही सीरिज रिलीज झालीय. या सीरिजमध्ये काजोल एका वकिली पेशात पहायला मिळाली आहे. नोयोनिका सेनगुप्ता हिच्या भूमिकेत ती पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला आली आहे. या सीरिजमध्ये तिने पहिल्या सीझनप्रमाणे एक किसिंग सीन दिला आहे. त्यामुळे तिची पुन्हा चर्चा होताना पहायला मिळतेय. सीरिजमधील तिचा ऑनस्क्रीन पतीला किस करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.