दुर्गा पूजेच्या कार्यक्रमात एकमेकींला मिठी मारून रडल्या काजोल अन् राणी मुखर्जी; ही व्यक्ती ठरली कारण

RANI MUKHERJEE AND KAJOL VIDEO: अभिनेत्री राणी मुखर्जी आणि काजोल यांच्या दुर्गा पूजेची दरवर्षी जोरदार चर्चा असते. यावर्षी मात्र चित्र थोडं वेगळं दिसलं.
rani mukherjee kajol

rani mukherjee kajol

ESAKAL

Updated on

सध्या देशभरात शारदीय नवरात्र मोठ्या उत्साहात साजरी केली जातेय. ठिकठिकाणी देवीची पूजा अर्चा मोठ्या भक्तिभावाने केली जातेय. बॉलिवूडमध्येही दुर्गा पूजा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दरवर्षी प्रेक्षकही या दुर्गा पूजेची आतुरतेने वाट पाहत असतात. या दुर्गा पूजेमध्ये अनेक कलाकार हजेरी लावतात. प्रेक्षक खासकरून अभिनेत्री राणी मुखर्जी आणि अभिनेत्री काजोल देवगन यांच्या दुर्गा पूजेमधील फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षीही त्यांचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. मात्र यावेळेस राणी आणि काजोल एकमेकींच्या गळ्यात पडून रडताना दिसल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com