

‘लागिरं झालं जी’ मालिकेत मामीची भूमिका साकारून लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्यासोबत पुण्यात धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुंबईहून साताऱ्याला जात असताना पुण्यातील नवले ब्रिजजवळ चार जणांनी त्यांची गाडी अडवून जबरदस्तीने गाडी ठोकली आणि पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचं अभिनेत्रीने सांगितलं. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधितांनी त्यांचा हात ओढून जबरदस्तीने आपल्या गाडीतून घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.