
गेल्या वर्षभरात अनेक मराठी कलाकारांनी चाहत्यांना गुड न्यूज दिल्या. कुणी लग्नबंधनात अडकलं, तर कुणी स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण केलं. कुणी घरात गृहप्रवेश केला तर कुणाच्या घरी नव्या गाडीचं आगमन झालं. आता अशाच एका मराठी अभिनेत्याने देखील चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीये. मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता अक्षर कोठारी याने नवी गाडी खरेदी केलीये. 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता अक्षर याने महागडी गाडी खरेदी करत सगळ्यांना आनंदाचा धक्का दिलाय.