

Kamali And Sanai Chaughade Mahasangam Episode
esakal
जेव्हा प्रेक्षकांचे दोन लाडक्या मालिका एकत्र येतात, तेव्हा छोट्या पडद्यावर जो धमाका होतो, त्याची मजा काही वेगळीच असते! झी मराठीवरील अश्याच दोन लोकप्रिय मालिका 'कमळी' आणि 'सनई चौघडे' विशेष 'महासंगम' भागासाठी एकत्र येत आहेत. जेव्हा दोन वेगवेगळ्या मालिकांचे कलाकार एकमेकांना भेटतात, तेव्हा कथेमध्ये फक्त संवाद नाही तर प्रचंड ड्रामा, अनपेक्षित ट्विस्ट आणि थरारक वळणं पाहायला मिळतात. हा महासंगम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची एक मोठी मेजवानी ठरणार यात शंका नाही.