इतके उद्योग करूनही 'कमळी' अखेर परीक्षेत पास झालीच; किती टक्के मिळाले माहितीयेत? प्रेक्षकांनाही आश्चर्याचा धक्का

KAMALI SERIAL LATEST UPDATE: लोकप्रिय मराठी मालिका 'कमळी' मध्ये आता कथा एक पायरी पुढे सरकणार आहे. अखेर कमळी परीक्षेत पास झालीये.
bhagyashree dalavi

bhagyashree dalavi

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील कमळी ही मालिका सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीये. सध्या मालिकेत कमळीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा दाखवला जातोय. उच्च शिक्षणासाठी गाव सोडून नवीन शहरात आलेल्या कमळीने तिच्या स्वप्नाच्या दिशेने पहिलं मोठं पाऊल टाकलंय. पदवी शिक्षणाच्या पहिल्या वर्षात ती उत्तीर्ण झालीये. विशेष म्हणजे तिचा निकाल स्वतः शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते जाहीर केला जातो. मात्र कमळीला किती टक्के मिळालेत माहितीये का?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com