

kamali latest promo
esakal
झी मराठीवरील प्रत्येक मालिकेत वेगवेगळे विषय मांडण्यात येतात. त्यात शिक्षण हा प्रत्येक मुलांच्या / विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. चांगले शिक्षण, नोकरी उद्योगाची योग्य संधी आणि उज्ज्वल भविष्याचं स्वप्न प्रत्येक विद्यार्थी पाहतो. मात्र, आजच्या वास्तवात शिक्षणाच्या वाढत्या खर्चापासून विद्यार्थ्यांसमोर विविध अडचणी आहेत, अनेक प्रश्न चर्चेत आहेत. झी मराठीने ‘कमळी’ मालिकेच्या निमित्ताने हाच मुद्दा प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.