

kamali serial new twist
esakal
छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या असतात. अशीच एक झी मराठीवरील गाजणारी मालिका म्हणजे 'कमळी'. या मालिकेतील पात्र आणि कथा दोन्हीही प्रेक्षकांच्या आवडीचे आहेत. आता कमळी मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे. गेले कित्येक दिवस प्रेक्षक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते ती गोष्ट घडणार आहे. कमळीला स्वतःच्या जन्मदात्याबद्दल समजणार आहे. मालिकेत आतापर्यंत सरोजने कमळीपासून राजन हाच तिचा बाप आहे हे लपवून ठेवलं. तर कमळी राजनची मुलगी आहे हे सत्य समोर न येण्यासाठी कामिनीने प्रयत्न केले. मात्र आता नशिबाचे फासे पालटणार आहेत. कामिनीमुळेच राजन आणि कमळीचं नातं सगळ्यांसमोर येणार आहे.