

marathi serial trp
esakal
छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. मात्र प्रेक्षकांची आवड निवड कायम बदलत असते. काही वर्षांपूर्वी झी मराठी टीआरपी यादीवर राज्य करत होतं. मात्र कोविडपूर्वी स्टार प्रवाहने आणलेल्या नव्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. त्यामुळे स्टार प्रवाहने टीआरपी यादीत टॉप १० मध्ये स्थान मिळवलं. आता मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांचा कौल झी मराठीला मिळताना दिसतोय. झी मराठीवरील 'कमळी ' ही मालिका नवनवीन इतिहास रचतेय. ती जुई गडकरीच्या 'ठरलं तर मग' ला धक्का देणार असं दिसतंय.