मला वाटलं माझी भूमिका संपली... काही दिवसांपूर्वीच एक्झिट; आता 'कमळी' मालिकेत अभिनेत्रीची पुन्हा एंट्री; कोण आहे ती?

KAMALI ACTRESS RE- ENTRY IN SERIAL: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये एक नवा ट्विस्ट येणार आहे. मालिकेतील एक अभिनेत्री पुन्हा एकदा मालिकेत दिसणार आहे.
kamali serial new entry

kamali serial new entry

esakal

Updated on

लोकप्रिय मराठी मालिका 'कमळी' मध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. टीआरपी मध्ये टॉप १ मध्ये आल्यावर झी मराठीने मालिकेत नवनवीन बदल करायचं ठरवलंय. मालिकेचं कथानक प्रेक्षकांनी आवडीने पाहावं यासाठी पुन्हा एकदा मालिकेत अभिनेत्रीची एंट्री होणार आहे. ही कोणतीही नवी अभिनेत्री नाही तर जुनंच पात्र आहे. ही आहे कमळीची आई. काही दिवसांपूर्वीच कमालीच्या आईचं मालिकेत निधन झालेलं. मात्र आता ते पात्र लेखकाने पुन्हा जिवंत केलंय. कमळीची आई सरोज कधी मेलीच नाही असं दाखवण्यात आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com