KAMALI SERIAL FAME SUSHMA JAYWANT VIRAL VIDEO
esakal
KAMALI SERIAL FAME SUSHMA JAYWANT VIRAL VIDEO: अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर सक्रिय असतात. चाहत्यांसोबत ते त्यांचे अपडेट्स नेहमीच शेअर करतात. परंतु याच सोशल मीडियामुळे कधी-कधी त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यांनी शेअर केलेल्या फोटो, व्हिडिओवर नेटकरी घाणेरड्या कमेंट्स करत असतात. कधी कधी तर अश्लील कमेंट्सचा ही सामना सेलिब्रिटींना करावा लागतो. अशातच कमळी मालिकेतील अभिनेत्री सुषमा जयवंत हिला देखील लाईव्ह करत असताना नेटकऱ्यांनी अश्लील कमेंट्स केल्या. त्यानंतर तिने त्यांना चांगलंच सुनावलंय.