
मुलगी शिकली, प्रगती झाली… किती सहज रुळलंय हे वाक्य आपल्या जिभेवर. शिक्षणाचं महत्व माहित नाही असं एकही घर महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. पण अजूनही महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात अश्या दुर्गम जागा आहेत, जिथे शिक्षणाच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत, पण गावच्या मुलींमध्ये उच्च शिक्षणाचं स्वप्नं मात्र पेरलं गेलंय. हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी गरज असते ती संधीची आणि प्रोत्साहनाची आणि हीच गरज लक्षात घेऊन 'कमळी'ने एक स्तुत्य पाऊल उचललं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 'कुरुंदवाड' मधील शाळेत जाऊन त्या १०० मुलींना सायकलींचं वाटप केलं.