झी मराठी वाहिनीवर येत्या काही दिवसात एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या कमळी मालिकेची पहिली झलक पहायला मिळाली होती. तेव्हा या मालिकेत विजया बाबर मुख्य भूमिकेत असल्याचं समोर आलं होतं. तेव्हापासून या मालिकेचा मुख्य नायक कोण असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. झी मराठीने नायक आणि इतर स्टारकास्ट गुलदस्त्यात ठेवलं होतं. अखेर झी मराठीने नवा प्रोमो शेअर करत पुर्ण स्टारकास्ट प्रेक्षकांना दाखवून दिली आहे.