

kanchan adhikari on amruta fadanvis
esakal
नुकताच मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांचा एक इव्हेंट झाला. यात त्या अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत दिसल्या. या इव्हेंटमध्ये कलाकारांना नृत्य करण्यास सांगितलं होतं. त्यासाठी अर्थातच प्रचंड पैसा खर्च केला गेला. त्यातही मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा इव्हेंट म्हंटल्यावर आणखीनच पैसा खर्च केला गेला. मात्र सध्या राज्यात दुष्काळ आहे. अनेक तालुक्यात आतापासूनच पाण्यासाठी स्त्रियांना मैलोनमैल पायपीट करावी लागतेय. राज्य शासनाने अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी परिस्थिती जैसे थे तशीच आहे. त्यात मराठवाड्यासारख्या भागात तर अतिशय गंभीर परिस्थिती आहे. मात्र अशातच मुख्यमंत्र्यांच्या पत्नी पैसे ग्लॅमरवर आणि ग्लिटरवर उडवत असल्याची टीका लोकप्रिय दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांनी केलीये.