
Bollywood Entertainment News : अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत आणि निर्माता करण जोहर यांच्यामधील वाद सर्वश्रुत आहे. त्यांच्यातील एकमेकांबद्दलची वादग्रस्त विधान खूप गाजली आहेत. नुकतंच सिनेमाच्या प्रोमोशन दरम्यान कंगनाने पुन्हा एकदा करण जोहरवर निशाणा साधला. करणला तिच्या सिनेमात काम देण्याची इच्छा तिने व्यक्त केली.