
कंगना रणौत ही बॉलिवूडमधील स्पष्टवक्ती, निर्भीड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिने अभिनयापासून ते राजकारणापर्यंत सगळ्याचा अनुभव घेतला आहे. ती कुणालाही न घाबरता निडरपणे बोलते. तिची वक्तव्य अनेकदा पटणारी असतात. त्यामुळेच ती सोशल मीडियावर चर्चेत असते. आता कंगना तिच्या अशाच एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. तिने मासिक पाळी दरम्यान मुलींवर असणाऱ्या निर्बंधांबद्दल भाष्य केलंय. सोबतच जेव्हा पहिल्यांदा तिला पाळी आली तेव्हा तीची काय प्रतिक्रिया होती हेदेखील तिने सांगितलंय.