Kangana Ranaut on Instagram : नानू मुस्लिम दादी पारसी...कंगनाने केली राहुल गांधींवर जातीवरून आगपाखड, वादग्रस्त पोस्ट चर्चेत

Kangana Ranaut slams Rahul Gandhi on Instagram : कंगना रणौतच्या राजकारणातील प्रवेशानंतर ती राजकीय चर्चेत जोमाने सहभाग घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Kangana Ranaut's Instagram post goes viral after targeting Rahul Gandhi
Kangana Ranaut's Instagram post goes viral after targeting Rahul Gandhi
Updated on

भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्यावर पुन्हा जोरदार टीका केली आहे. कंगनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिने राहुल गांधी यांच्या कुटुंबातीव व्यक्तींचा उल्लेख करत हल्लाबोल केला आहे.

राहुल गांधी यांनी नुकतेच भाजपचे खासदार अनुराग ठाकुर यांनी त्यांचा अपमान करत शिवी दिल्याचा आरोप केला होता. यावर कंगनाने राहुल गांधी यांचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये राहुल गांधी लोकांना त्यांची जात विचारताना दिसत आहेत. या व्हिडीओवरून कंगनाने राहुल गांधी यांना चांगलेच फटकारले आहे.

कंगना रणौतच्या राजकारणातील प्रवेशानंतर ती राजकीय चर्चेत जोमाने सहभाग घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता कंगनाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यामध्ये काही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये पहिल्या व्हिडिओवर विरोधकांचा दुतोंडी चेहरा असं लिहलं आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी लोकांना त्यांची जात विचारताना दिसत आहेत.

दुसऱ्या व्हिडीओत अखिलेश यादव बोलताना दिसत आहेत. या व्हिडीओवर कंगनाने काही मजकूर लिहिला आहे, ज्यामध्ये राहुल गांधी यांच्या कुटुंबाबद्दल भाष्य केलं आहे. कंगनाने लिहीलं की, स्वतःच्या जातीचा काही पत्ता नाही, आजोबा मुस्लीम, आजी पारसी, आई ख्रीचन आणि स्वतः असे वाटतात जसे पास्ताला कडीपत्ता टाकून फोडणी देत खिचडी बनवण्याचा प्रयत्न केलाय, आणि यांना सगळ्यांची जात महिती करून घ्यायची आहे. हे उघडपणे कोणालाही जात कशी विचारू शकतात. राहुल गांधी तुमचा धिक्कार असो.

Kangana Ranaut's Instagram post goes viral after targeting Rahul Gandhi
SC-ST Creamy Layer : आरक्षणात 'एससी-एसटी'नां देखील लागू होणार 'क्रीमिलेअर'? उप-वर्गीकरणाचा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने नेमकं म्हटलं
kangana ranaut post On Rahul Gandhi
kangana ranaut post On Rahul Gandhi

राहुल गांधीचा व्हिडीओ कधीचा आहे?

कंगनाने पोस्ट केलेला व्हिडीओ ज्यामध्ये राहुल गांधी विचारताना दिसत आहेत की, या खोलीत दलित किती आहेत. मजा पाहा, या खोलीत ओबीसी किती आहे. हा व्हिडीओ ऑक्टोबर २०२३ सालचा आहे. तुसरा व्हिडीओ राहुल गांधी यांच्या फेब्रुवारी २०२४ मधील रॅलीचा असून यामध्ये राहुल गांधी यामध्ये जातीबद्दल बोलत आहेत. नंतर अखिलेश यादव यांचा व्हिडीओ लावण्यात आला आहे, ज्यामध्ये ते तुम्ही जात कशी विचारली असे ओरडताना दिसत आहेत.

नेमकं झालं काय?

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षाचे नेते अनुराग ठाकुर यांच्यावर आरोप केला होता की, त्यांनी यूनियन बजट सेशनमध्ये त्यांना शिवी दिली आणि अपमान केला. अनुराग ठाकुर म्हणाले होते की ज्यांच्या स्वतःच्या जातीचा पत्ता नाही ते जातनिहाय जनगणनेबद्दल बोलत आहेत. नंतर अनुराग ठाकुर यांनी मी कोणाचं नाव घेतलं नव्हतं असं स्पष्टीकरण देखील दिले होते.

Kangana Ranaut's Instagram post goes viral after targeting Rahul Gandhi
Nitin Gadkari: हत्येच्या काही तास आधी हमास प्रमुख अन् गडकरी होते एका मंचावर! समोर आला फोटो; नेमकं काय घडलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com