

Anant Nag
ESakal
नवी दिल्ली : भारतीय चित्रपटसृष्टीतील भरीव योगदानाबद्दल दिग्गज कन्नड अभिनेते अनंत नाग (वय ७८) यांना सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या २०२४ च्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या २२ सप्टेंबर रोजी गुजरातच्या केवडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या सन्मानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाग यांचे अभिनंदन केले आहे.