चाकूने वार करत डोकं भिंतीवर आपटलं!अभिनेत्रीला नवऱ्याने केली मारहाण, डोळ्यात मिरी पावडर फेकून केले वार
Kannada Actress Shruthi Attacked by Estranged Husband: कन्नड मालिकांमध्ये काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती हिच्यावर तिच्याच नवऱ्याने प्राणघातक हल्ला केलाय. डोळ्यात मिरी पावडर टाकत चाकूने वार केलेत.
Kannada Actress Shruthi Attacked by Estranged Husbandesakal
कन्नड टीव्ही अँकर आणि मालिकांमधील अभिनेत्री श्रुती हिच्यावर विभक्त झालेला नवरा अंबरीश यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडलीय. कौटुंबिक आणि आर्थिक वादातून ही घटना घडल्याचं सांगण्यात आलय. 4 जुलैला ही घटना घडली होती.