
साऊथ इंडस्ट्रीमधून एक वाईट बातमी येत आहे. कन्नड रिअॅलिटी शो कॉमेडी खिलादिलूच्या तिसऱ्या सीझनचे विजेते आणि प्रसिद्ध कन्नड अभिनेता राकेश पुजारी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. राकेशने वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. राकेशच्या निधनामुळे त्याचे चाहते धक्क्यात आहेत. स्टार्सपासून ते चाहत्यांपर्यंत, प्रत्येकजण सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहे.