
kantara chapter 1
esakal
ऋषभ शेट्टीच्या 'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलाय. कोट्यवधींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाची सपशेल मीडियावर जोरदार चर्चा आहे. यातील ऋषभ शेट्टीच्या अभिनयाचंदेखील कौतुक होतंय. त्याने या चित्रपटात त्याचा आजवरचा सगळ्यात उत्कृष्ट अभिनय केला आहे. त्यानेच या चित्रपटाचं दिग्दर्शनदेखील केलंय. मात्र सगळीकडे चित्रपटाची चर्चा सुरू असताना चित्रपटातील एका दृश्यात २० व्या शतकातील एक गोष्ट दिसली जी पाहून प्रेक्षक चकीत झालेत. ही एक मोठी चूक मानली जातेय.