
rishab shetty wife pagati
esakal
'कांतारा चॅप्टर १' या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ पाडलीये. 'कांतारा' या चित्रपटाचं दिग्दर्शन रिषभ शेट्टी याने केलं होतं. त्याने त्यात प्रमुख भूमिका साकारत प्रेक्षकांना आपलंसं केलेलं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली होती. आता त्या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. 'कांतारा चॅप्टर १' ची देखील तितकीच चर्चा आहे. हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना आवडलाय. या चित्रपटाचं दिग्दर्शनही रिषभ शेट्टी याने केलंय. रिषभचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत. त्यात त्याची पत्नीही दिसतेय. तुम्ही त्याच्या पत्नीला पाहिलं आहे का?