AI Edited Ending: रांझणा’ चित्रपटाचा एआयने बदललेला शेवट वादाचा विषय ठरला. करण जोहर यांनी आनंद राय यांच्या बाजूने नैतिक जबाबदारीवर भर दिला. चित्रपटातील बदल नैतिकतेच्या मर्यादेत रहाणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या ‘रांझणा’ या चित्रपटाचा एआयच्या सहाय्याने बदललेला शेवट दाखवत पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला. यामुळे निर्माते इरॉस इंटरनॅशनल आणि राय यांच्यात वाद पेटला.