
२०२५ मध्ये जानेवारी महिन्यात सैफ अली खानवर हल्ला झाला होता. मुंबईतील त्याच्या राहत्या घरी त्याच्यावर चाकू हल्ला झाला. त्यानंतर त्याला इस्पितळात दाखल करण्यात आलं. बांगलादेशातील शरीफुल इस्लामला अटक करण्यात आली होती. शरीफुल चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरात शिरलेला. तो थेट मुलांच्या खोलीत शिरला. त्या झटापटीत सैफला मोठी जखम झाली. त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली. हा सगळा प्रकार तैमूर आणि जेहसमोर घडला. आता या घटनेच्या इतक्या महिन्यानंतर अभिनेत्री करीना कपूर यावर व्यक्त झालीये.