ना ओरडली, ना मारलं... जेहला धाक दाखवण्यासाठी करिना कपूरने जे केलं ते पाहून नेटकरी म्हणतात, 'ही तर आमच्या आईसारखीच...'

KAREENA-KAPOOR-MOM-LIFE: जेहला रागावण्यासाठी करीना कपूरने केलेली गोष्ट पाहून प्रेक्षकांनाही हसू आवरत नाहीये. तिचा व्हिडिओ पाहून नेटकरी निरनिराळ्या प्रतिक्रिया देताना दिसतायत.
kareena kapoor

kareena kapoor

ESAKAL

Updated on

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर इंडस्ट्रीमधील टॉप अभिनेत्रींनपैकी एक आहे. तिने कायमच आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ घातली. करीना चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत राहिली. तिने घटस्फोटीत सैफ अली खानशी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय हा कायमच चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिलाय. करीना आणि सैफ एकमेकांसोबत कायमच आनंदी दिसतात. त्यांना तैमूर आणि जेह अशी दोन मुलं आहेत. करीना आणि सैफ दोघे मिळून त्यांना वळण लावताना दिसतात. अशातच आता करीनाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ती जेहवर रागावताना दिसतेय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com