

meera rajput and kareena kapoor
esakal
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि बेबो करीना कपूर यांची लव्हस्टोरी तर सगळ्यांना ठाऊक आहे. २००४ पासून २००७ पर्यंत हे दोघे एकमेकांना डेट करत होते. मात्र नंतर त्यांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर ते दोघे एकमेकांचं तोंडही पाहत नव्हते. एखाद्या कार्यक्रमात भेटल्यावर एकमेकांकडे पाहतही नव्हते. मात्र आता असं काहीतरी घडलंय ज्यामुळे चाहते देखील चकीत झालेत. शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत आणि करीना कपूर एकत्र दिसल्या आहेत. त्यामुळे अभिनेत्याची पत्नी आणि एक्स गर्लफ्रेंड या दोघी एकत्र कशा असा प्रश्न आता नेटकऱ्यांना पडलाय. कारण त्यांना असं काहीतरी दिसलंय ज्याची कुणालाही सुतराम शक्यता दिसत नव्हती.