

kareena kapoor
esakal
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या चित्रपटांसोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चाहत्यांमध्ये चर्चेत असते. ती तिच्या बिनधास्त बोलण्यामुळेही सगळ्यांच्या नजरेत येते. काही दिवसांपूर्वी करीनाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला ज्यात ती जिममधून बाहेर पडताना तिचं पोट दिसत होतं. त्यामुळे अनेकांनी ती पुन्हा गरोदर असल्याचं म्हटलं. मात्र करीनाच्या टीमने या सगळ्या अफवा असल्याचं सांगितलं. आता करिनाने ती तिच्या दोन्ही मुलांना कशी वाढवते याबद्दल सांगितलं आहे.